Success Marathi Suvichar with Images

Success Marathi Suvichar : नमस्कार मित्रांनो, हमेशा सोबत! आजपासून पुन्हा एक नवीन “Success Marathi Suvichar” सहित पोस्ट आहे. आशा आहे की हे तुम्हाला आवडेलं आणि तुम्ही हे तुमच्या मित्रांसह शेअर करणार आहात.

नशिबात आणि नजरेत’ एकच फरक आहे…
जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला हवी असते.

Success Marathi Suvichar
Success Marathi Suvichar

शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून
असते की, त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल.

परस्थितीच्या हातातील कठ पुतळी कधीच होऊ
नका कारण तुमच्यात परिस्थिती बदलण्याची ताकत आहे.

काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या
दोऱ्याप्रमाणे असते, दिसणे महत्त्वाचे नाही तर असणे महत्त्वाचे असते.

आपले दुख:किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात,
कारन हे कलियुग आहे इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनतो.

माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो.
मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.

जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आर्थिक
स्थिती नाही तर मनस्थिती चांगली असावी.

विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे, तर ते संबंध
अबाधित राहण्यासाठी वापरलेले प्रभावी शस्र आहे.

ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून रहात
नाही पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून रहाते.

धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात.

Happy Life Quotes Marathi

संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा
कोणताही मोठा दागिना नाही ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान.

Success Marathi Suvichar
Success Marathi Suvichar

लिहिलेली प्रत्येक गोष्ट वाचणाऱ्याला समजु शकत नाही कारण लिहीणारी
व्यक्ती भावना लिहीते आणि वाचणारी व्यक्ती फक्त शब्द वाचते.

ज्यांना अपयशाची भीती वाटते तेच अपयशी ठरतात ज्यांना
अपयशाची भीती वाटत नाही यश त्यांची वाट पाहत उभं असतं.

जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा
स्वतःला बदलून घ्या, कारण पुर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा
स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे.

भावना ह्या शब्दांपेक्षा नजरेला जास्त स्पष्ट कळतात,
फक्त वाचवण्याची कला आपल्याला अवगत पाहिजे.

आयुष्याच्या प्रत्येक वळनावर सगळं आपलचं होत गेलं असतं,
तर “गमवायची भीती” अन “मिळवायची किंमत” कधीच समजली नसती.

काही वाक्य चेहर्‍यावर वाचता येतात त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते.

आपल्या सुखाचं क्षितीज इतरांचा नजरेत भले ही सीमीत
असेल पण स्व:ताचा नजरेत त्याला सिमा नसली पाहिजे.

माणसं जरी सोन्यासारखी असली तरी त्यांच्यातही कॅरेटचा फरक असतोच.

समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यासारखी असते.
जे फक्त त्या पोत्याकडे बघतात त्यांना ती जड वाटते
पण जे ती हाताळतात त्यांनाच तिचे खरे वास्तव कळते.

प्रेरणादायी विचार मराठी

आपलां व्यक्तिमत्त्व हे समईच्या मंद प्रकाशासारखं हवं. शांत,
सात्विक ! प्रकाश कमी असला तरी मनाला शांती देणारा! धीर देणारा.

Success Marathi Suvichar
Success Marathi Suvichar

छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी मोठी नाती उध्वस्त होतात.

आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजे रोजच स्तुती होत राहीली तर
आयुष्यात प्रगतीचा मार्ग बंद होतो व गर्वीष्टीचा मार्ग सुरु होतो.

पैशाने विकत घेत येत नाही अशी एखादीतरी गोष्ट तुमच्या
जवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका.

चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे परंतु नळाला
पाहून चिखलात जावु नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती
आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये.

कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका
आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका.

प्रेम व आनंद देणार्‍या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची
एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल मिळकत असते.

तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका कारण या खेळाला
अंत नाही जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते.

जीवनात चूका, अपयश आणि नकार हा एका अर्थी प्रगतीचाच भाग असतो,
आणी जो यांना सामोरे जात नाही तो यशस्वी होऊ शकत नाही.

Life Quotes in Marathi

वाद फक्त माझंच योग्य आहे हे सांगण्यासाठी असतो.
संवाद काय योग्य आहे ? हे शोधण्यासाठी असतो.

Success Marathi Suvichar
Success Marathi Suvichar

आपली प्रतिष्ठा सांभाळणे महत्वाचे आहे कारण हीच
एक अशी गोष्ट आहे, जी आपल्या वयापेक्षा जास्त टिकते.

संकटांचे आभाळ ज्या अर्थी इतके भरुन आले आहे त्या अर्थी
सुखाचा श्रावण ही अगदी जवळपास असणार अशा आशेवर जगणे हेच जीवन.

ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे
बरोबरला बरोबर आणि चुकीला चुक म्हणण्याची हिम्मत ठेवतात.

स्पष्ट बोला पण असे बोला कि समोरच्याला कष्ट होणार नाही
अन् त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही.

भूतलावर मनुष्य हा एकमेव प्राणी आहे, जो आपले विष आणि गोडी
त्याच्या दातांमधून नव्हे परंतु जिभेद्वारे बाहेर टाकू शकतो.

प्रत्येक बदलत्या वर्षात जुनी माणसं आपल्या
सोबत असणं ही आयुष्याची मिळकत असते.

प्रत्येक लहान गोष्टी मध्ये केलेली सुधारणा मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जाते.

अनुभव हा महान शिक्षक आहे,
पण तो मोबदला मात्र फार घेतो.

माणसाला आयुष्यात सर्व काही भेटतं परंतु तो जे शोधतो ते कधीच
भेटत नसतं, ते शोधण्यातच त्याचे पुर्ण आयुष्य संपतं ते म्हणजे समाधान.

नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला
डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.

जीवनावर मराठी स्टेटस

सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या असतात कसोटी लागते ती अनुभवाच्या पातळीवर.

Success Marathi Suvichar
Success Marathi Suvichar

कुणाला न दुखवता जगणे यांच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही.
आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज राहत नाही.

माणसं ओळखायची आणि पारखायची असतील तर त्यांच्या
मानविरुद्ध एकदा वागुन बघा तुम्हाला तुमची जागा समजेल.

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.

उगवत्या सूर्याची सकाळी जेवढी आतुरतेने वाट पाहिली जाते
तेवढाच त्याचा दुपारी तिरस्कार केला जातो, एक गोष्ट नेहमी
लक्षात घ्या,तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते.

आयुष्यात जे शिकुन घेता येईल ते शिकुन घ्या कोणतीच
संधी वाया घालवू नका कारण आयुष्यात शिकलेली
प्रत्येक गोष्ट कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही.

आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चाललं
पण प्रेमाची माणसंअशी मिळवा की कोणाला
त्याची किंमत करता येणार नाही.

माणसाला माणसांजवळ आणणे हीच खरी
समाज सेवा हिच खरी प्रगती आणि माणसाने
माणसांशी माणसासारखे वागणे हाच खरा धर्म.

माणसानं पावसा सारख बरसाव,
पाण्यासारख निर्मळ असावं,
जिथं जाव तिथं तृप्तता,समृद्धता आणि आनंद देत व घेत रहावं.

अक्षरांच्या ओळखी सारखी माणसांची नाती असतात.
गिरवली तर अधिक लक्षात राहतात; आणि वाचली तर अधिक समजतात.

Motivational Quotes in Marathi for Success

जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन
जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडवून
सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की अपोआप सुटतात.

Success Marathi Suvichar
Success Marathi Suvichar

प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात
असे नाही काही दुखणी कुटुंब आणि मित्र मंडळी
यांच्या बरोबर हसण्या आणि खिदळण्यानेही बरी होतात.

कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे.
त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्ही कडे उजेड पडतो.

ज्या दिवशी माणूस समजेल कि समोरचा माणूस चुकीचा नाही
फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत
त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज दुर होतील.

शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून
असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल.

सुंदर आयुष्य सहज घडत नसतं,
तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून,
माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून घडत असतं.

वेळे अभावी संगत तुटली तर तुटू द्यात पण संवाद तुटला नाही
पाहिजे कारण संवाद हा चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते.

कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करु नका.
छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो.

सोनं अंगावर घातले म्हणजे, माणूस मौल्यवान होतो
असे नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी.

ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात
पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते.

Good Thoughts in Marathi Text

योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे
मौन पाळणं नेहमीच संकटाना दुर ठेवायला मदत करते.

Success Marathi Suvichar
Success Marathi Suvichar

जीवनात यशस्वी होण्या साठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो,
एक “निंदक” आणि दुसरा “स्पर्धक” कारण दोन्ही व्यक्ती माणसात “जिद्द” निर्माण करत असतात.

आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात.
पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही,
स्वतःवर विश्वास असला की,जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

आयुष्यात स्वतःशीच स्पर्धा करून स्वतःला सर्वोत्तम
बनवणं ही आयुष्यात मिळालेल्या यशाची खरी व्याख्या आहे.

एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये कारण
प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो.

प्रेम आणि मैत्री अशीे दोनच नाती आहेत की त्यांना
नियमांची गरज नसते कोणी मनाशी जुळलें की मैत्री होते
आणि कोणी मनांत शिरलें की प्रेम होते.

कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म
दुसरे कोणतेही नाही ज्याला हे कळले त्याला पुण्य कमवण्याची आवश्यकता राहत नाही.

एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा
स्वतःवर नाराज व्हा कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती.

कुणाची स्तुती कितीही करा पण अपमान खुप विचारपुर्वक करा कारण अपमान हे
असे कर्ज आहे जे प्रत्येक जण व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो.

Motivational Quotes And Status In Marathi

दुख: आणी त्रास ही अशी एक प्रयोगशाळा
आहे जिथे तुमच्या क्षमतेची आणी आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते.

Success Marathi Suvichar
Success Marathi Suvichar

जगणं ठाऊक असणाऱ्यांना, ‎वागणं कसं असावं हा प्रश्न
कधीच पडत नाही. जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहित
असते जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा मनापासून विचार करतात.

साखरेची गोडी सेकंदच राहते पण माणसाच्या
स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून जाते.

खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही.
ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देते.

लोक सहज म्हणतात कोणी कोणाचे नाही पण स्वतःला
विचारण्याचे विसरून जातात की आपण कोणाचे आहोत.

जिद्दीच्या प्रवासात शांतता अन संयम खुप महत्वाचा असतो शत्रू मिळवणंही
वाटतं तेवढं सोपं नसतं त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात.

माणुस कितीही आपल्या बुध्दीनुसार शक्तीनुसार जीवन जगत
असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट
आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्विकारावाच लागतो.

प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसु नये जिवलगाची सोबत कधी सुटु नये.
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.

जगाजवळ किती आहे यापेक्षा स्वतः हा जवळ काय
आहे यातचं माणसाचं समाधान दडलेलं असतं.

कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहचत असेल तर ईश्वराचे
आभार माना कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या
मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे.

Success Quotes in Marathi

भविष्य घडविण्याची ताकद हाताच्या मनगटात असतांना
आपण मात्र तळहाताच्या रेषांमध्ये बघत असतो.

Success Marathi Suvichar
Success Marathi Suvichar

आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे शेवटी शोध
थांबतो तो या निष्कर्षावर की जे मिळालं ते तरी कुठे सोबत नेता येणार आहे.

अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान,
आणि वैर भावना, माणसाला अनेकदा हरवते हे
ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही.

लांब धागा व लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात.
म्हणून धाग्याला गुंडाळुन आणि जिभेला सांभाळून ठेवले तरच आपले जिवन सुखी होईल.

जग नेहमी म्हणतं चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
“लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही.”

संघर्ष हे प्रगतीच आमंत्रण असते. जो ते स्वीकारतो तो पुढे जातो.
योग्य नियोजन आणि श्रेष्ठ नेतृत्व असले की हजारो तलवारींचे युद्ध सुद्धा एका वाघनखांवर जिंकता येत.

सूर्य आणि बाप या दोघांची गर्मी सहन करायला शिकायला पाहिजे,
कारण ह्या दोन्ही मावळल्या की चारही बाजूला अंधार पसरतो.

ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत.. तो तोडताना दहा वेळा विचार करतो.
आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो मग ती झाडे असोत की नाती.

सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं, जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे
गळणाऱ्या पानासारखं असावं, जे क्षणात निघून जावं.

सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे.
तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद भ्रमात आहे.
म्हणून कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका.

Inspirational Marathi Suvichar

वयाने आणि शरीराने आपण आपोआप मोठे होत जातो
पण जोवर आयुष्यात अडचणी, अपयश भेटत नाही.
तोवर आपण हुशार, चतुर व समजदार होत नाही.

Success Marathi Suvichar
Success Marathi Suvichar

नुसती कुस बदलुन कधीच दुःख हलकी होत नाहीत त्यासाठी वेदना झटकून उठावं लागतं,
अन सुखाच्या स्वागतासाठी प्रयत्न करावे लागतात,
तेही अगदी दम लागेपर्यंत कारण दुःखाला पळवून लावलं तरच सुख आपल्या घराचा उंबरा ओलांडतो.

कडू गोळी चावली नाही तर ती गिळली जाते,
त्याप्रमाणे जीवनात अपमान, अपयश, धोका,
यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसाल,
आठवत राहल, तर जीवन आणखी कडू होईल.

चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नये कारण ते पाऱ्यासारखे असतात
जेव्हा त्यांच्यावर घाव घातला जातो तेव्हा ते तुटले जात नाहीत
पण निसटून शांतपणे आपल्या आयुष्यातून निघून जातात.

सर्वात महाग “जागा” कोणती ?
जी आपण दुसर्याच्या “मनात” निर्माण करतो ती महाग जागा तिचा भाव करता
येऊ शकत नाही अन् ती एकदा जर गमावली
तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं.

आता तुम्हाला किती त्रास होतोय याला काही हरकत
नाही पण जेव्हा तुम्ही कालांतराने मागे वळून पाहाल
तेव्हा तुम्हाला जाणवेल कि त्याच त्रासामुळे तुमचे आयुष्य आता सुकर झाले आहे.

रस्त्यावर वेगाची मर्यादा असते. बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते. परीक्षेत वेळेची मर्यादा असते.
परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते.
म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा.

दुस-यांची मदत करण्यासाठी कोणाकडे ही वेळ नसतो,
परंतु दुस-यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वाकडे वेळ असतो,
एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही
जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते.

पुस्तकाने माणसाचं मस्तक सशक्त होतं.
सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं.
आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसतं.

जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत नुसतं
राब राब राबणे म्हणजे आयुष्य नाही तर स्वतःच्या
समाधानासाठी “आनंदाने” जगणे म्हणजे आयुष्य.

Life Marathi Suvichar

मनमोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं अंतर
कळालं की आयुष्याच्या वाटा या आभाळासारख्या होतात.

Success Marathi Suvichar
Success Marathi Suvichar

यशाला शॉर्टकट नसतो, कष्ट करावंच लागेल,
आणि एकदा यशाची वाट सुरु झाली कि त्याला युटर्न सुध्दा नसतो.

दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी,
तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते.

उंचावरून सारं जग दिसतं पण जमिनीवर राहून ते कळते आणि काय काय
समजून घ्यायचंय हे समजण्यासाठी विचारांची उंची गाठावीच लागते.

कपाट आणि मन वेळोवेळी साफ केले पाहिजे,
कारण कपाटात अडचण होते सामानाची आणि मनाला अडचण होते गैरसमजाची.

प्रत्येकाच्या अंगी एक ताकद आणि एक कमजोरी हि असतेच .कारण मासा जंगलात पळू शकत नाही .
आणि वाघ पाण्यात आपलं साम्राज्य तयार करू शकत नाही.

ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान विष
आहे परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृत आहे.

कधीच कोणावर अवलंबून राहू नका, जे करायचं आहे ते स्वतःच करून दाखवा.
दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो.

संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो,
बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुध्दा ओळख देतात.

जमणार नाही असा विचार करत बसण्यापेक्षा करुन तर बघू म्हणत केलेली
सुरुवात म्हणजेच जीवनात यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं.

Success Suvichar Marathi

शब्द हे चावी सारखे असतात, जर त्यांची योग्य निवड केली तर ते कोणाच्याही
हृदयाचे टाळे उघडू शकतात, आणि कोणाचेही तोंड बंद करू शकतात.

Success Marathi Suvichar
Success Marathi Suvichar

कामात इमानदारी आणि जबाबदारी असली की अपयशाची उधारी चुकवत यश आपल्या दारी येतं.

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते,
जेव्हा तुम्ही जिंकू लागता तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.

स्वप्न म्हणजे आपण केलेला केवळ विचार असतो पण उद्दिष्ट म्हणजे
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठरवून केलेले प्रयत्न आणि कृती असते.

आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया
असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

चुकीचे वागल्यावरचं शिक्षा मिळते असे काही नाही,
कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते.

माणूस तेव्हाच अस्वस्थ होतो जेव्हा त्याचा आतला आवाज
आणि बाह्य वागणूक यांचा ताळमेळ जुळवू शकत नाही.

आठवणी सांभाळणे सोप्प असत, कारण मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत, कारण क्षणांच्या आठवणी होतात.

भावनांचा अन वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही, त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात.

जिवनात पुढे जायचे असेल तर कानाने बहिरे व्हा,
कारण काही मोजकीच माणस सोडली तर बाकीचे मनोबळ दुबळे करणारेच असतात.

Success Marathi Suvichar

जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे.
जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात.

Success Marathi Suvichar
Success Marathi Suvichar

संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत
नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही.

दुसऱ्यांच्या नजरेनं सुख पाहणारी माणसं आयुष्यभर समाधानी राहू शकत नाहीत,
त्यांना नेहमी कोणत्या तरी गोष्टीची कमतरता जाणवतेच.

जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या
आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खुप किंमती असतात.

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं
असतो एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो.

आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्ती बरोबर मैत्री करा.
अनुभव न घेता ही आयुष्यात खुप काही शिकायला मिळते.

थोडे लपून स्वतःसाठी जगा, कारण जबाबदारी
असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही थकल्यावर थोडी विश्रांती घ्या.

प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर
चुकीचे ठराल, म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं.

कधी कधी तुम्हाला तुमची चांगली बातमी स्वतःकडेच ठेवावी लागते.
कारण प्रत्येक जण तुमच्यासाठी खरोखर आनंदी होत नाही.

माणसांचे स्वभाव आपण बदलवू शकत नाही.
पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्कीच बदलू शकतो.

अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा
विश्वास जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व चांगले होईल.

मागे मागे धावल्यानंतर जे पुढे पुढे पळतं तिथे थांबायचं असतं,
ध्यानीमनी नसताना जे मिळतं त्याला जीवापाड जपायचं असतं.

माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते,
दाखवली तरच ‘भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवट पर्यंत टिकते.

आयुष्य कसं जगावं ते वाहत्या पाण्याकडून शिकावं
वाटेतील खड्डा टाळून नाही तर भरून पुढे निघावं.

एकदा का माणूस आतून तुटून स्वतःहून सावरला की तिथून पुढे
आयुष्य जगताना त्याला कुणाच्या सहवासाच्या आधाराची गरज भासत नाही.

संवाद कमी होऊ लागला की नात भरकटायला लागत
आणि हवं असलेलं नातंही संपुष्टात येत त्यामुळे जसा वेळ मिळेल भेटत जा बोलत जा.

मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही
घर छोटं असले तरी चालेल पण मन माञ मोठ असल पाहिजे.

शोध घ्याल तरच मार्ग सापडेल,
मार्ग कधीच तुमचा शोध घेत येत नाही.

फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो पण अगरबत्ती नाही कारण
ज्याचे कर्तुत्व दरवळते त्याला कोणी विझवु शकत नाही.

दुःख इमानदार असतें, थेट काळजात शिरते आणि दीर्घकाळ सोबत राहतं.
सुखं वाफेसारखं असतें, घडीभर रेंगाळत आणि बघता बघता उडून जातं.

अगरबत्तीचा सुगंधही त्याचवेळी दरवळतो
ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देते.

कोटयवधी रूपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात
मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणूसकी आणि माणसं कमवावी लागते.

इतरांचे हृदय जिंकणे हाच जीवनाचा हेतु ठेवा कारण
जग जिंकुन सिंकदर सुद्धा रिकाम्या हातानेच गेला होता.

अनुभवानुसार माणसांची पारख करा म्हणजे चांगली माणसे दुर होणार नाहीत,
आणि स्वार्थ साधणारे जवळ राहणार नाहीत.

एखाद्याची झेप पाहून आणि भरारी घेण्याची इच्छा मनात
बळकट होवून गाठलेले आभाळ म्हणजे जिद्द.

ॠतू संपल्यावर पडणारा पाऊस हा जसा नकोसा होतो ,
तसंच गरज संपल्यावर एखाद्या नात्याचं जर ओझं वाटायला लागलं तर याचा अर्थ ते नातं नक्कीच स्वार्थासाठी होतं.

देव कधीच कुणाचे नशीब लिहीत नाही.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार,
आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहीतात.

माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे.
परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे.

झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची
आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते.

राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.

आजचं Success Marathi Suvichar पोस्ट तुमच्याकडून कसं वाटलं, ते कमेंट करून जरूर सांगा. हमेशा तुमच्या समर्थनाबद्दल आभारी राहूँ आणि आगामी पोस्टमध्ये तुमच्या आत्मीयतेची धारा करण्यात कोटिंग करणार आहे. धन्यवाद!

हे देखा जाए:

Leave a Comment