Marathi Suvichar:नमस्कार मित्रांनो, सदैवच सुरुवात! आजपर्यंत आपल्याला एक नवीन पोस्ट “Marathi Suvichar” सहित प्रस्तुत करता येत आहे. आशा आहे कि हे पोस्ट आपल्याला आवडेल आणि आप त्याचं आपल्या मित्रांसह सामायिक करणार आहात.
रागामध्ये हजारो शब्दांचा प्रयोग करण्यापेक्षा,
मौन ह्या ऐका गोष्टीमुळे जीवनात शांतता निर्माण होते.
कात्रीची धार गेली तर कापड एक वेळ कापलं जात नाही,
पण खात्रीची धार गेली की नातं मात्र हमखास कापलं जातं.
घड्याळाच्या गजरापेक्षा ज्यांना जबाबदारी जागं करते,
ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात.
सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो
आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.
येताना काहीच आणायचं नसतं तर जातानाही काहीच न्यायचं नसतं,
मग हे आयुष्य कोणासाठी जगायचं असतं? खरं तर या प्रश्नाचं उत्तर
शोधण्यासाठीच आयुष्य सार्थक लावायचं असतं.
संसार हा मातीतल्या घरात असू द्या किंवा सिमेंट च्या घरात
असू द्या तो फक्त सुखी आणि समाधानी असला पाहिजे.
सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका वेळ वाया जाईल हि दुनिया मतलबी झाली
आहे त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ येईल.
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती
जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात.
मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही कारण तिथे जे पेरलं जातं ते
अधीकच वेगाने वाढत जातं मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो.
कौतुक बऱ्याचदा लांबच्या लोकांकडूनच होतं
जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जातो.
Marathi Suvichar
जिद्दीचे पंख असलेला पक्षी यशाची उंच भरारी घेतल्याशिवाय राहत नाही.
ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.
लोकांचा जास्त विचार करू नका कारण ज्याच्याकडे काही नाही
त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्या वर जळतात.
आपल्या समोर केलेलं कौतुक ही आपली स्तुती असते,
तर आपल्या माघारी केलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असतं.
कपडे फाटके असले तरी चालतील पण आपण आपल्या भावना
आणि सर्वस्व गहाण ठेवतो ते ह्रदय कधीही फाटकं नसाव.
काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि
काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं.
कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो,
पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.
पैशापेक्षा चरित्र कपड्या पेक्षा आरोग्य आणि
विचारापेक्षा आचार व शब्दापेक्षा कृती महत्त्वाची असते.
सुरुवात आणि शेवट या गोष्टी नाममात्र
असतात खरी परीक्षा तर सातत्यामध्ये असते.
शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते
आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतॆ.
Success Marathi Suvichar
मनुष्य निवास बदलतो, वस्त्र बदलतो राहणीमान बदलतो,
तरीही दुःखीच राहतो. कारण तो स्वतःला बदलत नाही.
पेरणी कधी कुठे आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जात नाही.
मग ती पेरणी धान्याची असो शब्दांची असो अथवा संस्कारांची.
तुम्ही जेव्हा मनावर विजय मिळवतात् तेव्हा कोणताही
विषय तुमची नजर आणि तुमचा मार्ग विचलित करू शकत नाही.
आशा आणि विश्वास ठेवणं कधीही चुकीचं नसते फक्त ते
आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा
कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा.
प्रतिबिंब कितीही स्वच्छ आणि निर्मळ दिसले तरी मनात
मात्र काय आहे, हे आपण कधीच ओळखू शकत नाही.
माणसाने वेळेसोबत चालावे काळाप्रमाणे बदलावे
परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवावे.
कोणाच्या बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या चुका शोधू नका कारण त्या शब्दापेक्षा
त्याच्या भावना अनमोल असतात शब्द ठरवता येतात भावना ठरवून येत नाहीत.
आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून
असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा.
कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळो वेळी झालेले डंख हे नवे पंख देऊन जातात,
काटा रूतल्याशिवाय वाटा सापडत नाहीत हा यशाचा सिद्धांत आहे.
लेकरू मोठ झाल्यावर, साहेब नाही झालं तरी चालेल पण
मायबापाच्या डोळ्यातले अश्रू पुसता येतील, एवढं मोठ नक्की व्हावं.
Life Marathi Suvichar
जेव्हा वेदना आणि कडू बोलणे दोन्ही सहन व्हायला
लागते त्यावेळी समजायचं की आपण जगायला शिकलो.
ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्नं मनात धरलेलं
कधीच मोडू नका. पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका.
सगळीच कामे शक्तीने होत नाहीत तर काही ठिकाणी सहनशक्ती हि वापरावी लागते.
रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस आणि
माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो.
चूक नसतानाही निव्वळ वाद टाळण्यासाठी मागितलेली माफी
हे जीवनातील सर्वोच्च संयमाचे उत्तम असे उदाहरण ठरते.
गर्वामुळे ज्ञानाचा, स्तुतीमुळे बुध्दीचा आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो.
आपण दुसऱ्याला दोष देऊन त्याला अयोग्य ठरविण्यात यशस्वी झालो
तरी त्यातून आपली स्वतःची योग्यता कधीच सिध्द करू शकत नाही.
प्रतिबिंब कितीही स्वच्छ आणि निर्मळ दिसले तरी मनात
मात्र काय आहे, हे आपण कधीच ओळखू शकत नाही.
प्रयत्न सोडणारे कधी जिंकत नाही आणि जिंकणारे कधी प्रयत्न सोडत नाही.
संगत धरताना माणसाने सावध असले पाहिजे,
कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे,
किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे.
Inspirational Marathi Suvichar
यशाच्या पायऱ्या चढताना मागे राहणाऱ्या लोकांशी चांगलाच
व्यवहार करा कारण उतरताना ते सर्वजण पुन्हा भेटणार आहेत.
चांगले निर्णय कसे घ्यायचे हे अनुभवांनीच कळतं आणि अनुभव हे
आपण काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय मिळत नाही.
आनंदी राहण्याचा अर्थ असा नाही की सर्व काही चांगलं आहे याचा अर्थ हा
आहे की तुम्ही तुमच्या दुःखापेक्षा उंच होऊन जगणं शिकलात.
तुम्ही गरिब म्हणुन जन्माला आलात हा तुमचा दोष नाही
परंतु तुम्ही गरिब म्हणुन मेलात तर हा तुमचाच दोष आहे.
नेहमी चांगल्या लोकांच्या संपर्कात रहा, कारण सोनाराचा
कचरा सुद्धा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो.
या जगात सगळ्या गोष्टी सापडतात.
पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही.
अपेक्षा करणं चुकीचं नसतं चुकीचं असतं ते
चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं.
यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे,
जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश तुमचेच आहे.
स्पर्धा कुणाशीही असो तयारी फक्त मोठ्या
नियोजनाने आणि मनापासून केली पाहिजे.
टीकाकारांचा नेहमी आदर करा कारण ते तु
मच्या गैर हजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात.
आयुष्यात एवढा संघर्ष तरी नक्कीच केला पाहीजे की,
स्वतः च्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दुसऱ्यांचं उदाहरण द्यावं लागणार नाही.
तुमची अर्थिक श्रीमंती कितीही उच्च असली तरी
तुमच्या वर्तनाची उंची सुध्दा महत्वाची आहे.
Marathi Suvichar Status
जिवन जगतांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोर जाऊन
त्यावर मात करणं म्हणजेच जिवनाचा आस्वाद घेणं.
स्वीकार करण्याची हिंमत आणि सुधार करण्याची
नियत असेल तर मनुष्य बरचं काही शिकू शकतो.
चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत,
पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो.
मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही
नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले जातात.
क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी वाईट
विचारांचे रूपांतर चांगल्या विचारांमध्ये करु शकते.
जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर
मिळणाऱ्या चार खांद्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो.
आपल्या चुका आपण मान्य केल्या की, आपोआप आपले मन आणि
विचार दोन्ही पण स्वच्छ होतात… फक्त चुका मान्य करायची हिंमत पाहिजे.
प्रारंभ करतांना मनात भिती किंवा शंका नको,
पहिलं पाऊल कायमच आत्मविश्वासाने टाका.
संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी
मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं.
खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं कारण
जे खऱ्या मार्गावर चाललात ते कायम रुबाबात राहतात.
Marathi Suvichar For Students
प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात.
फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते
आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते.
पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे,
कारण शाबासकी आणि धोका दोन्हीही पाठीवरच मिळतात.
शिंपल्यासारखी खूप कमी लोक या जगात असतात ते
दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ कधीच बघत नाहीत.
जी व्यक्ती मनापासून तुमाची आहे तिला ओळखायला शिका कारण
खोटेपणाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतात.
नातं जपण्यासाठी कधी कधी आपण
आपले शब्दही जपून वापरावे लागतात.
जोवर तुम्ही धावण्याचे धाडस करणार नाहीत तोवर
स्पर्धेमध्ये जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील.
नुसतं मन समुद्राएवढे असून चालत नाही,
खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी, वेदना
सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते. आणि तेही हसत-हसत.
खेळ पत्यांचा असो किंवा आयुष्याचा,
तुमचा एक्का तेव्हाच दाखवा, जेव्हा समोर बादशाह असेल.
मी आहे म्हणुन सगळे आहेत या ऐवजी सगळे आहेत म्हणुन मी आहे
हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही.
Marathi Suvichar Short
जगावे तर बुद्धिबळातल्या वजीरा- सारखे कारण संपूर्ण खेळात समोरच्या
बादशहाला भीती आणि दहशत हि वजीराचीच असते राजाची नाही.
जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात.
त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं
आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं.
आयुष्यात सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर पहिलं स्वतःला राजा
समजणं आवश्यक आहे, कारण गुलामगिरीच्या विचारसरणीतून
फक्त गुलामच तयार होतात राजा नाही.
दुःख विसरायचं असेल तर स्वतः हसायला शिकावं
आणि आनंद हवा असेल तर इतरांना हसायला शिकवावं.
चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका,
कारण बदनामीची भिती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिंमत नसते.
जीवन जगायचं तर पावलांच्या जोडी सारखं जगा.
प्रथम पुढे पडणाऱ्या पावलाला गर्व नसतो तर, मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो,
कारण दोघांनाही माहिती असत, आपली स्थिती बदलत राहणारी आहे.
अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता
धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य.
अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात.
गिरवली तर अधिक लक्षात राहतात, आणि वाचली तर अधिक समजतात.
वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा पण जवळची माणसं तोडू नका,
कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधीच परत येत नाहीत.
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
चांगले सुविचार
आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या
मागे धावताना मिळालेला अनुभव बरचं काही शिकवून जातो.
आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा
जिथे स्वाभिमान मिळेल नाही तर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोकं खूप सराईत आहेत.
तुमची मेहनत प्रामाणिक असली की तुम्हाला यशस्वी
होण्यासाठी प्रमाण देण्याची गरज भासत नाही.
व्यक्तीमत्वाला आणि स्वभावाला न शोभणा-या भूमिका नाईलाजास्तव,
साकारायला भाग पाडणारा अनियंत्रीत चित्रपट म्हणजे आयुष्य.
माणसाचा स्वभाव हा प्रामाणिक असावा,
कारण ओळख जरी नावाने होत असली तरीही
आठवण नेहमी माणसाच्या स्वभावाचीच होते.
सगळं काही विकत घेता येतं पण कुणाचं मन आणि
भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही.
क्षमता प्रत्येकामध्ये असते पण यशस्वी तोच होतो
जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.
आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे
धावताना मिळालेला अनुभव बरचं काही शिकवून जातो.
जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरवात ‘कठीण
गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार
असेल तर त्याची सुरवात अशक्य’ गोष्टीने होते.
100 मराठी सुविचार
लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या
यशासाठी कित्येक वर्षे संघर्ष करावा लागतो.
कोणालाही आपलसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही
फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असलं पाहीजे.
कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधीही बदलत नाही.
फक्त एका घावाची गरज आहे. जर बोटावर बसला,
तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो.
परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून होणारी कमाई नव्हे,
तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्त्व होय.
सगळेच रस्ते हे शेवटला जात असतात पण शेवटला जाणारे सगळेच,
स्वप्न असते असे नाही. म्हणून शेवटला जाण्याचा नाही तर स्वप्नांना पूर्ण करण्याचा ध्यास धरा.
चांगला विचार केल्यानेच नवीन पर्वाला सुरुवात होते,
नाहीतर फक्त तारीख बदलते वेळ नाही.
किती कमावून ठेवलं तरी बाकी फक्त शून्य राहते शेवटी
आपल्या कर्माने साठवलेले पुण्यचं संकटाच्या वेळी कामाला येते.
अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात ज्या दिवशी
मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल.
शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते
आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते.
पॉझिटिव्ह सुविचार
जर नशिब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते.
आणि नशिब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरवात अशक्य गोष्टीने होते.
थोडंफार सहन करायला शिकलं पाहिजे कारण आपल्यातही बऱ्याच अशा
कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात.
संयम आणि सहनशीलता हा कमकुवतपणा नाही
तर अशी ताकत आहे जी सर्वांकडे नसते.
शिंपल्यासारखी खुप कमी लोकं असतात,
या जगात जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत.
आनंदी राहिल्याने मनासारख्या गोष्टी घडत नसतात
तर घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या वाटतात.
जेव्हा वेदना आणि कडू बोलणे दोन्ही सहन व्हायला लागते
त्यावेळी समजायचं की आपण जगायला शिकलो.
अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे ती म्हणजे अहंकार तुम्हाला हे
कधीच जाणवू देत नाही कि तुम्ही चुकीचे आहात.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा, अन् कुणी चुकलं तर माफ करा.
आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे
धावताना मिळालेला अनुभव बरचं काही शिकवून जातो.
चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात कारण
चांगल्या माणसामुळे चांगली वेळ येऊ शकते.
आत्मविश्वास सुविचार मराठी
वयापेक्षा माणसाला त्याची परिस्थिती आणि त्याच्यावरची
जबाबदारीच अधिक सक्षम बनवत असते.
आशा आणि विश्वास चुकीचे कधीही नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की
आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा.
जीवनात जिवंत व्यक्तीला खाली खेचण्यासाठी
आणि मृत व्यक्तीला उचलण्यासाठी लोकं कमालीची एकता दाखवितात.
मदतीची परतफेड करता आली नाही तरीही चालेल
पण मदत करणाऱ्याला कधीही विसरु नका.
दुनिया अशीच आहे, दुसऱ्याच्या चुका काढतांना विचार सुचवतात
आणि स्वता:च्या चुका निघाल्या की विषय बदलतात.
अंतरमणात कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावर
हास्य दाखविणे हाच जीवनातील सर्व श्रेष्ठ अभिनय.
जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे मात्र ती तुमच्या विचारावर
आणि बघण्याच्या दृष्टिकोन वर अवलंबून आहे.
आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही,
म्हणून ते मांडायचे सोडू नका, कारणं काही विचार हे
दुसऱ्यांना पटले नाही तरी, विचार करायला लावतात हे मात्र नक्की.
आपण चालतोय त्या वाटेशी एकनिष्ट असलो की वाटेत
येणा-या आडथळ्यांची पर्वा राहत नाही.
100 छोटे सुविचार मराठी
संगत धरताना माणसाने सावध असले पाहिजे,
कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे,
किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे.
दुसऱ्याकडून अपेक्षा करायला हरकत नसते पण
त्यासाठी अगोदर त्याचा विश्वास कमवावा लागतो.
जोपर्यंत तुम्ही धावण्याचे धाडस करणार नाहीत.
तोपर्यंत स्पर्धेमध्ये जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील.
काही इच्छा पावसाच्या थेंबासारख्या असतात ज्यांच्या प्राप्तीच्या
इच्छेने तळवे ओले होतात, पण हात नेहमीच रिकामे असतात.
संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात
योग्य समजतील पाठीमागे ढकलण्यात नाही.
चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये,
कारण एका विशिष्ट वेळेनंतर,
तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते.
डोळ्यातून पडलेले अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं
पुन्हा त्याची स्वतःची जागा कधीच मिळवू शकत नाही.
ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यांतील भाव कळतात त्याच नात्यांना खरा अर्थ असतो.
बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहीलेली व्यर्थ ओझी असतात.
आयुष्याचा रस्ता जरी सोनेरी असला तरी त्यावर
चालण्यासाठी एका सोबतीची गरज असतेच.
सुखाला कितीही विनवण्या केल्या तरी, लवकर घरात येत नाही आणि
दु:खात दरवाजा बंद केला तरी ते खिडकीतून आल्या शिवाय राहत नाही.
200 मराठी सुविचार
यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या
नशीबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे दिसून येईल.
सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते,
कारण अहंकार कधीच सत्य स्विकारत नाही.
व्यवहारात रोख अन् कामात चोख असणारी माणसे
जगाच्या बाजारात आपली किंमत राखुन असतात.
पुस्तकं आणि आयुष्याचे व्याकरण सारखेच आहे.
शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि
माणसांची निवड चुकली तर आयुष्य बिघडते.
आपल्यासमोर केलेलं कौतुक ही आपली स्तुती असते,
तर आपल्या पाठीमागे केलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असतं.
“शब्दकोडी” सोडवतांना बुद्धीची कसोटी लागते… तर “
आयुष्याची” कोडी सोडवतांना सहनशक्तीची कसोटी लागते.
जीवनात सर्वात मोठा गुरु येणारा काळ असतो,
कारण काळ जे शिकवतो ते कोणी शिकवू शकत नाही.
भावनांचा अन् वेदनांचा कधीच हिशोब लावता येत
नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात.
जीवनातील प्रवासामध्ये आपले बोट कोणी धरलंय हे महत्वाचे,
तो कृष्ण असेल तर आपण अर्जुन, आणि शकुनी असेल तर आपण दुर्योधन हे निश्चित.
सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असते.
Marathi Suvichar
आयुष्यात संगतीला फार महत्व आहे,
कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते आणि विचार सोबतच्या व्यक्तींमधुन येतात.
यशाला चकाकी तेव्हाच मिळते, जेव्हा प्रयत्नांचा पाया मजबूत असतो,
अन् व्यक्तीला आदराचे स्थान तेव्हाच मिळते, जेव्हा त्याची प्रत्येक कृती प्रामाणिक असते.
स्वभाव मनापर्यंत पोहचला तरचं आपुलकीचं नातं निर्माण होत,
नाही तर ती फक्त ओळखच ठरते.
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची, फक्त दोनच कारणं असतात.
एक तर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो.
चव गोड हवी असेल तर चटका सहन करावाच लागतो मग तो चहाचा असो की आयुष्याचा.
आयुष्यातील कोडी सोडवायला माणसाच्या स्वभावात गोडी असावी लागते.
उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही,
काही उत्तर स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात.
स्वभाव असा ठेवायचा की आपल्या सहवासाची एक-वेळ जाणीव नाही
झाली तरी चालेल, पण दुराव्यात मात्र आपली उणीव भासली पाहिजे.
विषय शून्याचा असो नाहीतर अनंताचा स्वाभिमानापुढे काहीच नाही.
तुम्ही कसं बोलता याला खूप महत्व आहे कारण दिसणं केवळ
आकर्षित करू शकतं तर बोलणं हृदयात स्थान मिळवतं.
नियती माणसाला फक्त जन्म देते पण
माणूसकी ही माणसाला स्वतः निर्माण करावी लागते.
स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत
त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खुप आवडत असतात.
आजचं “Marathi Suvichar” पोस्ट तुमच्याकडून कसं वाटलं, ते कमेंट करून जरूर सांगा. आम्ही आणखी मनोरंजक पोस्ट तुमच्याकडून सादर करण्याचं प्रतिबद्ध आहोत.
हे देखा जाए: