Suvichar Marathi: नमस्कार मित्रांनो, सदैवच सुरुवात! आजपर्यंत आपल्याला एक नवीन पोस्टSuvichar Marathi सहित प्रस्तुत करता येत आहे. आशा आहे कि हे पोस्ट आपल्याला आवडेल आणि आप त्याचं आपल्या मित्रांसह सामायिक करणार आहात.
तू लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस
तू विकला गेला म्हणजे, समाजाला कमजोर करशील.
प्रत्येक झाडाने फळ द्यायला हवं हे गरजेचं नाही
एखाद्या झाडाची सावलीसुद्धा खुप आधार देऊन जाते…!!!
संकटातुन वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही
आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किंमत समजत नाही.
मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतू कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत…!
शेतीमध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून
टाकतो याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार
भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.
आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला
कधीच मनःशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा.
सराव तुम्हाला बळकट बनवतो. दुःख तुम्हांला माणूस बनवते.
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला
चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.
मन गुंतायला वेळ लागत नाही ,
मन तुटायलाही वेळ लागत नाही.
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला
आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला.
स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा,
अभिमानाने लहान राहणं, कधीही चांगलं…
छोटसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा,
जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.
कंदील जरी सुर्याची बरोबरी करु शकत नसला तरी
अंधारात त्याच महत्व सुर्याइतकच असतं.
त्यामुळे स्वत:ला कधीच कमी समजू नका.
चांगले सुविचार
चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.
शून्यलाही किंमत देता येते फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे राहा…!!
कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी
आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य.
पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही.
जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात.
जगावे तर बुद्धिबळातल्या वजीरा सारखे कारण संपूर्ण खेळात
समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत हि वजीराचीच असते राजाची नाही.
संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता
आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही.
तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही तुमच्या
आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात
म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करा.
माणसाजवळ त्याच्या आयुष्य भराची संपत्ती
म्हणजे त्याचे चांगले विचार हेच चांगले
विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात.
दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका,
मनाचं बालपण आणि अंतःकरणातल देवपण हे
संपल की माणूस संपला.
आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात.
काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप
हसत असतो तर काही वेळा आपण आनंद
साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो हीच आयुष्याची गंमत आहे.
मदत ही अशी बाब आहे ,
केली तर विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात.
100 मराठी सुविचार
स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की,
परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल
आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे.
संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी
जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते.
अंदाज चुकिचा असू शकतो पण अनुभव कधीच चुकिचा
असू शकत नाही कारण अंदाज आपल्य मनाची
कल्पना आहे तर अनुभव आपल्या जीवनातील सत्य आहे.
प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत कधीच अडथळा
निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत
अडथळा निर्माण करणारा कधीच प्रगती करत नाही.
थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते.
पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही,
म्हणून शरीर थकले तरी चालेल परंतु मनाला कधी थकून देऊ नका.
वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे.
म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट
वेळी चिंता करू नका दोन्ही बदलणार आहे.
शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना
शोधा बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील.
ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग फक्त
चंद्र तारकांना स्पर्श करुन जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका.
आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं. कारण
अहंकारापासून ते लांब असतं. “हम कुछ है” हा
भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क, झुंज, स्पर्धा आणि संघर्षच .
वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोड़ा पण जवळची माणसं तोडू नका,
कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधीच परत येत नाहीत.
पॉझिटिव्ह सुविचार
मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा,
अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना,
घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल जीवनाचा.
नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका
कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते.
माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहिजे
लोकांच काय ,लोक तर देवात पण चुका काढतात.
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात पण चालणारे
आपण एकटेच असतो. पडल्यावर हसणारे अनेकजण
असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
कोणाच्या बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या चुका
शोधू नका कारण त्या शब्दापेक्षा त्याच्या भावना
अनमोल असतात शब्द ठरवता येतात भावना ठरवून येत नाहीत.
कोणी कोणाला काही द्यावे ही ,
अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते.
नात्यांना खूप सुंदर आवाजाची आणि चेहऱ्याची गरज नसते,
गरज असते ती सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची.
राग आल्यावर तो व्यक्त करणे जितके सोपे
असते त्याहून कितीतरी कठीण असते ते म्हणजे शांत
राहून त्यावर संयम ठेवणे आणि संयम ठेवणे
ज्याला कळलं त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला.
परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत
कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेली ही असतात.
कडकडुन भुक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते,
आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोसं होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं.
आत्मविश्वास सुविचार मराठी
डोळे आणि भावनिक स्पर्श..शब्दांपेक्षा छान बोलतात..
अट एकच समोरच्याला ते समजुन घेण्याच्या भावना असल्या पाहीजेत.
शब्दांनाही स्वतःचे असे तापमान असते ते कोणत्या वेळी कसे
वापरले जातात यावरून कळते की ते शब्द जळणार आहेत की थंडावा देणार आहेत.
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात
तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच काही लोक तुमचे पाय पकडायला सुरवात करतात.
देह सर्वांचा सारखाच फरक फक्त विचारांचा या छोटयाशा
आयुष्यात स्वतःला असे बनवा की लोक तुमच्या कड़े एकमेव उपाय म्हणून पाहतील पर्याय म्हणून नाही.
सुखाच्या भरपूर व्याख्या असतील पण
मिळालेल्या प्रत्येक क्षणात आनंद शोधनं म्हणजेच खरं सुख.
आयुष्यात कधीही स्वत:ला कुणापेक्षा कमी समजू नये
आणि कुणापेक्षा श्रेष्ठही समजू नये.कारण स्वत:ला कमी
समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो.
सगळी दु:ख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल
हा भ्रम आहे मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील.
आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या
गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे.
संस्कारांच्या तालमीत शिकलेले
डाव माणसांना जीवनात कधीच हारू देत नाहीत.
मनातील माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर समजून जावं ते आपल्या मापाचे राहिले नाहीत.
सुविचार मराठी छोटे
शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की,
जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते.
फुले नित्य फुलतात. ज्योती अखंड उजळतात. आयुष्यात चांगली माणसे नकळत मिळतात.
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो. पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो.
प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतील ही पण
त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो.
जगातलं कटु सत्य हे आहे की नाती जपणाराच
नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे.
सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या
कारण यशस्वी काय करायचं ते सांगतो आणि अयशस्वी काय करू नये ते सांगतो.
आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन
आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात फक्त चुका मान्य करायची हिम्मत पाहिजे.
नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे
तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही
बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.
सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची.
दोन्ही परीक्षा मध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो.
मोर नाचताना सुद्धा रडतो. आणि राजहंस मरताना सुद्धा गातो.
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही.
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.
आयुष्यातील झालेला त्रास विसरून जा,
पण त्यातून घेतलेला धडा विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एकच आहे,
तो म्हणजे लोक काय बोलतील, हा विचार करणं सोडून द्या.
100 छोटे सुविचार मराठी
जो फरक औषधांनी पडत नाही,
तोच फरक दहा मिनिटं ज्यांच्याशी बोलून
पडतो ना तीच आपली माणसं असतात.
नेहमी सत्याच्या मार्गाने चला या मार्गाने अपघात कमी होतात.
कारण या मार्गाने येणार्यांची संख्या फार कमी असते.
चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही
नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात.
समजवण्या पेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजून घेण्यासाठी
अनुभवचा कसं लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्या माणसांकडून
असे म्हणले जाते की काळजी करू नको सर्व काही ठीक होईल.
चांगले व्यक्तीमहत्व कधीच जन्म घेत नाही ते निर्माण करावे लागते.
आपल्या सोबत दुसर्यांचं ही भल व्हावं अशी ज्यांची मानसिकता
असते त्यानां आयुष्यात काहीच कमी पडत नसते.
संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे.
ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही.
एकटेपणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच येत
असतो कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या एकटेपणातच सापडतात.
यशाचा आनंद घ्या पण पराभवाने
शिकवलेले धडे कधीच विसरु नका.
जिंकायची मजा तेव्हाच आहे जेव्हा अनेकजण
तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात.
मराठी सुविचार
कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं
असावं कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून
जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं.
शब्द हे एका चावीसारखे असतात कधी
मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात.
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे
तर ती परिस्थितीवर केलेली मात असते.
आयुष्य आणि पुस्तकांचे व्याकरण सारखेच आहे शब्दाची
निवड चुकली की वाक्ये बिघडते आणि माणसांची निवड चुकली तर आयुष बिघडते.
कुणी तरी पुढे गेला म्हणून, द्वेष करत बसण्यापेक्षा,
आपण मागे का राहीलो? हा विचार करा
आणि चालत राहा. स्पर्धा स्वत:शी करा जगाशी नाही.
ईच्छा आणि अपेक्षा मर्यादित
असल्या की स्वाभिमान विकण्याची वेळ येत नाही.
व्यक्तीमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका
नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रीत चित्रपट म्हणजे आयुष्य.
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र
भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी
सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते.
Suvichar Marathi
जसे आहात तसेच रहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार
बदलायचा प्रयत्न केला तर, आयुष्य कमी पडेल.
आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात,
कारण वाटणं आणि असणं यात खुप फरक असतो.
अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस
अडकला की तो स्वतः सत्त्व, तत्व, मैत्री,
नातं, एवढंच काय तर माणुसकी पण विसरून जातो.
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती
जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात.
माणसाचे दोन गुरू असतात एक अनुभव
आणि दुसरा कर्म हे दोघेही सोबत राहतात.
कर्म हे लढायला शिकवत असतो आणि अनुभव हा जिंकायला शिकवत असतो.
जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे.
पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा,
आयुष्यभर प्रामाणिक राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं हिच श्रीमंती आहे.
सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला
कुठेतरी समाधानाची सीमा असावी.
अज्ञानी मनुष्य चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करत
असतो आणि ज्ञानी मनुष्य चुका सुधारून मोठा होत असतो.
कर्तूत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंख हे
नवे पंख देऊन जातात. काटा रूतल्याशिवाय
वाटा सापडत नाही हा यशाचा सिद्धांत आहे.
पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा ,
आयुष्याची पलटणारी पान ही खूप काही शिकवून जातात.
Success Marathi Suvichar
आपण फक्त आनंदित राहण्याचा प्रयत्न करावा,
कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी
लोक पूर्ण वेळ काम करत असतात.
जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधीकधी धीर देणारा हात,
ऐकून घेणारे कान आणि समजून घेणार्या हृदयाची गरज असते.
विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल.
परंतु खरा योद्धा तोच जो पराजय होणार हे
माहित असूनही जिंकण्यासाठी लढेल.
ठेच तर लागतच राहिल ती सहन करायची हिंमत ठेवा
आणि कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या माणसांची किंमत ठेवा.
पैशाने श्रीमंत असलेली माणसे पावला-पावलावर भेटतात पण मनाने
श्रीमंत व निस्वार्थी असणारी माणसे भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात.
एक काळ असा होता कोणाला तुम्ही फक्त स्टेशनवर सोडायला गेलात तरीही
माणसांचे डोळे पाणवत होते.आता स्मशानात सुध्दा डोळे ओले होत नाहीत.
तुलना आणि इर्षा करण्यात आपला किंमती वेळ वाया घालवू नका ,
कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो, तसेच कोणाच्या तरी मागेही असतो.
ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते
तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होतो.
भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाहीत पण एक योग्य निर्णय आपले भाग्य बदलू शकतो.
कर्तृत्व आणि जगणं असं असावं आपल्या
असण्याचा प्रभाव आणि नसण्याचा अभाव जाणवला पाहिजे.
Suvichar in Marathi
पोटाची भूक आणि गरजा माणसाला दुनियादारीचे
सर्व नियम स्वीकारायला भाग पाडतात.
लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही तसेच हाक
आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मनही जुळत नाही.
अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो की अहंकार हा नेहमी
इतरांना झुकवण्यात आनंद मानतो तर, संस्कार नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो.
भागिदारी करायची तर एखाद्याच्या दुःखात करा
कारण सुखाचे दावेदार तर खुप जण असतात.
प्रत्येक माणसाला वाटतं की, समोरचा माणूस सुखी आहे.
पण तो हे विसरतो की, त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे.
कौतुक बऱ्याचदा लांबच्या लोकांकडूनच होतं.
जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जातो.
परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत.
कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेली ही असतात.
ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुस-
या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही तिथंच खरं प्रेम नांदत असतं.
आयुष्यात आपल्यावर जीव ओवाळणारी माणसं खूप कमी असतात म्हणून त्यांना
सहजपणे गमवू नका कारण आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते.
गती येण्यासाठी आपले “चरण” आणि प्रगती
होण्यासाठी आपले “आचरण” खूप महत्त्वाचं आहे.
Life Marathi Suvichar
आयुष्य ही एक परिक्षा आहे. त्यात दुःख हा प्रश्न आहे,
आणि आनंद हे उत्तर आहे. जे स्वताःवर विश्वास ठेवून
प्रत्येक दिवस आनंदाने जगतात तेच ही परिक्षा पास होतात.
शिक्षणातून आणि कुटुंबातून घेतलेले ज्ञान माणूस कदाचित विसरेल
परंतु जीवनातील अनुभवातून घेतलेले धडे माणूस कधीही विसरू शकत नाही.
माफी मागून छोटं व्हावं पण
खोटं बोलून मोठं कधीचं होऊ नये.
जो डोळयातील भाव ओळखून शब्दातील
भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो.
जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते.
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो.
तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.
शब्द दिल्याने आशा निर्माण होतात
आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास.
स्पर्धा करायची असेल तर ती येणाऱ्या
संकटाशी करावी, आपल्या माणसांशी नव्हे.
जिवनाच्या परीक्षेत कोणतेही गुण मिळत नसतात,
लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करता आलं की समजायच आपण पास झालो.
सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरु लागतं, तेव्हा
समजावं कि खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे.
मनातलं जाणणारी ‘आई’ आणि भविष्य ओळखणारा ‘
बाप’ या शिवाय मोठा ज्योतिषी कोणीही नाही.
Good Morning Suvichar Marathi
होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता,
फक्त मनस्ताप वाढवते आत्मविश्वास नाही.
कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधीही बदलत नाही.
फक्त एका घावाची गरज आहे. जर बोटावर बसला,
तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो.
कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंख हे नवे पंख देऊन जातात
काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही हा यशाचा सिध्दांत आहे.
स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की,
परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल
आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे.
विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे तर ते
संबंध अबाधित राहण्यासाठी वापरलेले प्रभावी शस्र आहे.
सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही
आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो.
आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही पण
चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा तीच खरी श्रीमंती.
फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमावून
जतन करणे महत्वाचे आहे. मग पैसा असो की माणसं.
शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन
विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते.
गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो
आणि त्याचा समतोल साधतांना संपूर्ण आयुष्य निघून जात.
Marathi Suvichar
कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका कारण
चालता चालता लोक विश्वासघात करतात.
स्वप्न मोफतच असतात ,
फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते.
संधी आणि सुर्योदय दोन्हीत एक साम्य आहे,
उशीरा जागे होणा-याच्या नशीबी दोन्ही नसतात.
स्वत:च्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा कि,
चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहीजे.
व्यक्तिमत्त्वाला आणि स्वभावाला न शोभणा-या भूमिका नाईलाजास्तव
साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य.
संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी..
जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते.
पराभवाची भीती कुणीच बाळगू नये एक मोठा
विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो.
स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की,
परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि
इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे.
विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले
पाहिजे कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते.
खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं ते कितीही
जुनं झाल तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही.
चांगले सुविचार
संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो
तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते.
ज्या वेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो
त्या वेळी नकळतच आपल्यामध्येही चांगले पहाण्याची ती सुरुवात असते.
तुमच्याकडे जे आहे, त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि तक्रार करणे थांबवा. हे
तुमचे तक्रार करणे इतर सर्वांना कंटाळा देते,
हे तुम्हाला चांगले नाही व त्यामुळे समस्येचे समाधानही होत नाही.
प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात.
फरक फक्त इतकाच आहे. जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते
आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते.
कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते.
जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते
त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत कळत नाही.
सहन केल्या जाणाऱ्या किंवा सहन कराव्या लागणाऱ्या
अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाहीत ते शब्द.
अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे.
अपेक्षा ठेवायची असेल तर विश्वास कमवावा लागतो.
गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यवहारीक
शिक्षणाने वाढते, शाळेच्या मार्कानी नाही.
काही माणसं लाखात एक असतात,
आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात.
आजचं Suvichar Marathi पोस्ट तुमच्याकडून कसं वाटलं, ते कमेंट करून जरूर सांगा. आम्ही आणखी मनोरंजक पोस्ट तुमच्याकडून सादर करण्याचं प्रतिबद्ध आहोत.
हे देखा जाए: