Suvichar in Marathi with Images

Suvichar in Marathi: नमस्कार मित्रांनो, सदैवच सुरुवात! आजपर्यंत आपल्याला एक नवीन पोस्ट Suvichar in Marathi सहित प्रस्तुत करता येत आहे. आशा आहे कि हे पोस्ट आपल्याला आवडेल आणि आप त्याचं आपल्या मित्रांसह सामायिक करणार आहात

आपले विचार सरळ असले ना मग, आयुष्यात येणारी
वळण कितीही वाकड़ी असली तर काही फरक पडत नाही.

Suvichar in Marathi
Suvichar in Marathi

शांततापूर्ण आयुष्याचे दोन नियम आहेत. अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचवू द्यायचे नाही,
आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही.

चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण काही
वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते.

जितकं तुम्ही परिस्थितीला घाबरणार तर परिस्थिती तुम्हाला अजून घाबरवेल
तुम्ही लढायचा सतत प्रयत्न करत रहा नक्कीच तुम्हाला काही तरी मार्ग सापडेल.

आवड असलेल्या गोष्टींची निवड करण्याचं
स्वातंत्र्य स्वतःला देता आलं की जगणं सुंदर होतं.

कोणालाही न दुखावता जगणे याच्याइतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही
आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे कर्म करण्याची गरज राहत नाही.

संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे,
जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचं यश मोठं असेल.

आयुष्यात कठीण परिस्थितीशी संघर्ष केल्यानंतर
एक बहुमोल संपत्ती विकसित होते ती म्हणजे, आत्मविश्वास.

प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते पण चारित्र्य
आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही. ती कमवावी व मिळवावीच लागते.

पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एक सारखंच साहित्य लागतं,
पण पुल लोकांना जोडायचं काम करतो, आणि भिंत वेगळं करायच काम करते.

Life Marathi Suvichar

सत्य पचवण्याची कुवत नसली, की माणसं
खोटी बदनामी करायला सुरूवात करतात.

Suvichar in Marathi
Suvichar in Marathi

जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला जग आपोआप बदलेल.

धनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसे धन असे पर्यंतच साथ देतात,
पण मनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसे आयुष्याच्या शेवटापर्यंत साथ देतात.

अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे
तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले, तो अनुभव.

योग्य वेळी चुकीच्या गोष्टी पासून स्वतःला दूर ठेवलं,
तर आयुष्यात अयोग्य वेळ येत नाही.

परमेश्वरानी दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वरानी
आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो.

लोहाराकडील अनेक हातोड्या तुटतात,पण ऐरण मात्र कायम टिकून रहाते,
अर्थात जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात पण
जे घाव सहन करतात ते कायम आयुष्यात अभंग राहतात.

स्वतःला सुंदर बनवायचं असेल तर
आपले गुण, कर्म आणि स्वभाव चांगले ठेवा.

तुमची कष्टाची मिळकत जर तुमच्या कुटुंबाची गरज भागविण्याइतकी
असेल तर स्वतः ला श्रीमंत समजा. कारण श्रीमंतीची
व्याख्या आजपर्यंत कुणालाच करता आली नाही.

आपल्या समस्या आपल्यालाच सोडवायच्या असतात.
कारण लोक फक्त तुम्हाला सल्ला देऊ शकतात, सोल्युशन नाही.

Suvichar in Marathi

दुःख आहे म्हणून सुखाला किंमत आहे
आणि सुख आहे म्हणून जगण्याची आस आहे.

Suvichar in Marathi
Suvichar in Marathi

स्वतः मध्ये बदल करण्याची एवढी क्षमता पाहिजे मग तो बदल आपल्यासाठी
कितीही त्रासदायक असला तरी तो करता आला पाहिजे.

माणसांच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही,
पण माणसांच्या चुकांची नोंद मात्र ज्यांचा संबंध नाही ते सुद्धा घेतात.

दु:ख आणि त्रास ही अशी एक प्रयोगशाळा आहे.
जिथं तुमच्या क्षमतेची आणी आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते.

इथं प्रत्येक जण मतलबी झाला आहे अगरबत्ती देवासाठी
म्हणून आणतात आणि सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.

पुस्तकांपासून शिकायचं म्हटलं की झोप येते
अन् आयुष्यापासून शिकायचं म्हटलं की झोप उडते.

प्रत्येक जण आपल्याला त्याच्या गरजेनुसार महत्व देत असतो.
आपला भ्रम असतो त्याच्यासाठी आपण खुप खास आहोत.

आपलं काहीही चुकलेलं नाही ही भावनाच
माणसाला नव्या क्षणाचं स्वागत करायला बळ देते.

संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी
तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते.

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका, कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

100+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

श्वास व विश्वास दोन्हीं अदृश्य आहेत परंतु दोघांत इतकी
ताकद आहे की, अशक्य गोष्टीलाही शक्य बनवतात.

Suvichar in Marathi
Suvichar in Marathi

उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही कारण काही
उत्तरं स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात.

आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर
करावं कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक करत नाही.

मनुष्याने कष्टाने मिळवले की जाणीव निर्माण होते
आणि कष्टविना कमावले की अहंकार निर्माण होतो.

नेहमी स्वतः सोबत पैज लावा, जिंकलात तर
आत्मविश्वास जिंकेल, आणि हारलात तर अहंकार हारेल.

माणसांनी माणुसकी दाखवली की समोरचा
माणूस आपोआप जिव्हाळ्याने वागतो.

नात्यांची कदर पैशापेक्षा जास्त करा, कारण त्यांना गमावणं
सोपे असतं पण पुन्हा कमावणं फार अवघड असते.

जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर, तुमच्या कामाची पद्धत बदला,
तुमचे तत्व नाही कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात मुळ नाही.

दु:खाचा विचार करत बसलं की समोर उभं
असलेल सुख पण डोळ्यांना दिसत नाही.

समाधान असेल तरच पैसा सुख देतो,
नाही तर कितीही मिळवला तरीही कमीच पडतो

चांगले सुविचार

शिंपल्यासारखी खूप कमी लोकं असतात या जगात ते दुसऱ्यांना
मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ कधीच बघत नाहीत.

Suvichar in Marathi
Suvichar in Marathi

सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात
कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते.

न रडता तर कांदा पण कापता येत नाही, मग हे तर आयुष्य आहे.
सुखात कसे जाईल, संघर्ष तर करावाच लागेल.

दुसऱ्याने आपल्याला समजून घ्यावे, असे प्रत्येकालाच वाटत असते,
पण दुसऱ्याला समजुन घ्यायची कोणाच्याही मनाची तयारी नसते.

आयुष्यात उजेड आला की अंधारात मदत करणाऱ्यांचा विसर पडतो.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

तू लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस
तू विकला गेला म्हणजे, समाजाला कमजोर करशील.

जोवर तुम्ही धावण्याचे धाडस करणार नाहीत तोवर स्पर्धेमध्ये
जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील.

प्रयत्न सोडणारे कधी जिंकत नाही
आणि जिंकणारे कधी प्रयत्न सोडत नाही.

आपल्या वाटेत कुणी खड्डा खणला म्हणून कधी नाराज होऊ नका

कारण तेच लोक आपल्याला उंच उडी मारायला शिकवतात हे विसरू नका

शालेय सुविचार मराठी

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षिसे हमखास
मिळतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरे म्हणजे टीका .

Suvichar in Marathi
Suvichar in Marathi

संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं.

मनातील इच्छाशक्ती जेव्हा मनगटात उतरते तेव्हा अशक्य गोष्ट ही शक्य वाटू लागते.

ज्या दिवशी तुम्ही स्वतःला जिंकाल त्या दिवशी या जगात तुम्हाला हरवणारा कोणीच उरणार नाही.

कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नाहीत.

“संयम ” हा शब्द आज आपली परीक्षा बघतोय
आपल्याला ह्या परीक्षेत जिंकायचे आहे प्रत्येक गोष्ट वेळ
घेते आणि प्रत्येक गोष्टीच उत्तर पण ” वेळ ” असते

कष्ट इतक्या शांततेत कराव कि यश धिंगाणा घालेल

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

उगवणारी प्रत्येक सकाळ आपल्याला शिकवून
जाते की एकतर झोपून स्वप्न बघत राहा किंवा
उठून स्वप्नांचा पाठलाग करा.

पॉझिटिव्ह सुविचार

प्रसंग परीक्षा घेत जातील,
आपण क्षमता सिद्ध करत जायची.

Suvichar in Marathi
Suvichar in Marathi

संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता
आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्हीही मिळत नाही

उगवणारी प्रत्येक सकाळ आपल्याला शिकवून
जाते की एकतर झोपून स्वप्न बघत राहा किंवा
उठून स्वप्नांचा पाठलाग करा…!!

तुमच्या चार दिवसाच्या प्रेमापेक्षा तुमच्या आईवडिलांची स्वप्नं खूप वर्ष जुनी आहेत.

क्षमता प्रत्येकामध्ये असते पण यशस्वी तोच होतो जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.

स्पर्धा कुणाशीही असो तयारी फक्त मोठ्या नियोजनाने आणि मनापासून केली पाहिजे.

100 मराठी सुविचार

जेव्हा सगळं संपून गेलं अस आपल्याला वाटत.
पण तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन घडवण्याची.

Suvichar in Marathi
Suvichar in Marathi

काट्यांवरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात.

आयुष्यात एवढा संघर्ष तरी नक्कीच केला पाहीजे की,
स्वतः च्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दुसऱ्यांचं उदाहरण द्यावं लागणार नाही.

झिकत नाही जवर तवर झुंजत राहायचं!!
हे शिकवलं माझ्या राज्यन

क्षमता प्रत्येकामध्ये असते पण यशस्वी
तोच होतो जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.

जिंकण्याच्या उत्साह हा हरण्याच्या
भीतीपेक्षा नेहमी मोठा असला पाहिजे.

जिंदगी में उतार चढाव तो आते जाते
रहते हैं आप कभी हार मत मानना.

आजचं Suvichar in Marathi पोस्ट तुमच्याकडून कसं वाटलं, ते कमेंट करून जरूर सांगा. आम्ही आणखी मनोरंजक पोस्ट तुमच्याकडून सादर करण्याचं प्रतिबद्ध आहोत.

हे देखा जाए:

Leave a Comment